Special Report | सदाभाऊंच्या हॉटेलवारीची ही घ्या बिलं

Special Report | सदाभाऊंच्या हॉटेलवारीची ही घ्या बिलं

| Updated on: Jun 18, 2022 | 10:22 PM

सदाभाऊ खोत मी त्यांना ओळखत नाही असं म्हणत असले तरी मग 65 पेक्षा जास्त बिल केलं कोणी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सांगोल दौऱ्यावर सदाभाऊ खोत यांना हॉटेल मालकांने आपल्या बिलासाठी अडवल्यानंतर माध्यमांतून सदाभाऊ खोत यांच्या हॉटेलच्या उधारीवर चर्चा झडू लागल्या. ज्याने सदाभाऊ खोत यांच्याकडे बिल मागितले तो खरच हॉटेल मालक आहे का, त्याचेच हॉटेल आहे का आणि तिथंपासून ते मी त्यांना ओळखत नाही इथपर्यंत या चर्चा नंतर झाल्या. मात्र आता सदाभाऊ खोत यांच्या या उधारीच्या गोष्टीवर हॉटेल मालकान आपली हिशोबवहीच सदाभाऊंवर समोर आणली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सदाभाऊंचे कार्यकर्ते जेवले किती आणि किती तारखेपासून ते किती तारकेपर्यंत ते इथे आले हेही त्यांनी आता आपल्या बिलातूनच सांगितले आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत मी त्यांना ओळखत नाही असं म्हणत असले तरी मग 65 पेक्षा जास्त बिल केलं कोणी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Published on: Jun 18, 2022 10:22 PM