सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त विधान, जवाहरलाल नेहरू यांनी केली महात्मा गांधी यांच्या विचारांची हत्या
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील खेडी लुटण्याचे काम जवाहरलाल नेहरू यांनी केले.
पुणे : महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील खेडी लुटण्याचे काम जवाहरलाल नेहरू यांनी केले. महात्मा गांधी यांनी सांगितले खेड्याकडे चला, खेडी समृद्ध करा. पण, नेहरूंनी सांगितले खेडी लुटा आणि शहरे समृद्ध करा.
महात्मा गांधी यांची हत्या माथेफिरू नथुराम गोडसे यांनी केली ही बाब निश्चितच निषेधार्ह आहे. पंरतु, महात्मा गांधी यांच्या विचारांची हत्या जवाहरलाल नेहरू यांनी केली हे सत्य मात्र आपल्याला स्वीकारावेच लागेल, असे वादग्रस्त विधान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केले.
Published on: Jan 28, 2023 03:22 PM
Latest Videos