‘राजू शेट्टी शेपटीला चिंध्या बांधून कार्यकर्त्यांना जाळतायत’; शेट्टी यांच्यावर शेतकरी नेत्याची बोचरी टीका

‘राजू शेट्टी शेपटीला चिंध्या बांधून कार्यकर्त्यांना जाळतायत’; शेट्टी यांच्यावर शेतकरी नेत्याची बोचरी टीका

| Updated on: Aug 10, 2023 | 1:18 PM

आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना फुटण्याच्या वाटेवर आहे. याच्या आधी अनेक नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जय महाराष्ट्र करत संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

मुंबई, 10 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कलह सुरू असल्याचे दिसत आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना फुटण्याच्या वाटेवर आहे. याच्या आधी अनेक नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जय महाराष्ट्र करत संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर नाराजी व्यक्त टीका केली होती. तसेच आपला कोणाशीही वाद नाही. तर नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि भूमिकेवर आक्षेप असल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर यावरून आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून राजू शेट्टी यांना आम्ही राज्यभर नेलं. हे नेतृत्व वाढलं पाहीजे. सत्तेच्या पटलावर आमचा माणूस हनुमान बनून गेला याचा अभिमान वाटायचा. पण नंतर कळालं की हा हनुमान नाही माकडं आहे. जे शेपटीला चिंध्या बांधून कार्यकर्त्यांना जाळतायत अशी टीका खोत यांनी केली आहे.

Published on: Aug 10, 2023 01:18 PM