संजय राऊत यांची इच्छा म्हणजे 'इच्छा माझी पुरी करा'चा पार्ट टू, कोणी उडवली खिल्ली?

“संजय राऊत यांची इच्छा म्हणजे ‘इच्छा माझी पुरी करा’चा पार्ट टू”, कोणी उडवली खिल्ली?

| Updated on: Jun 19, 2023 | 8:21 AM

ठाकरे गटाचे रविवारी वरळीत राज्यव्यापी शिबिर पार पडले. या कार्यक्रमात बोलताना खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीत आपली इच्छा असेपर्यंत राहू असं वक्तव्य केलं आहे. सजंय राऊत यांच्या विधानानंतर राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. त्यांच्या या विधानावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे : ठाकरे गटाचे रविवारी वरळीत राज्यव्यापी शिबिर पार पडले. या कार्यक्रमात बोलताना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत आपली इच्छा असेपर्यंत राहू असं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स आणि चर्चा होत आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं आहे. पाहावं तिकडं भावी मुख्यमंत्री. आपण मविआमध्ये आहोत. राहू. जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत. ते काही आमच्या इच्छेवर नाहीये, हे राजकारण आहे. पण आपण पाहतोय भावी मुख्यमंत्री, अरे बाबानो अजूनही विद्यमान मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) समोर बसलेले आहेत”. सजंय राऊत यांच्या विधानानंतर राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. त्यांच्या या विधानावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दादा कोंडके यांचा एक चित्रपट होता इच्छा माझी पुरी करा, त्यानंतर दादा कोंडके यांचा इच्छा माझी पुरी करा या चित्रपटाचा पार्ट टू म्हणजे संजय राऊत” या सिनेमाचा पार्ट टू,” असा टोला खोत यांनी लगावला.

Published on: Jun 19, 2023 08:21 AM