उद्धव ठाकरे यांचे मगरीचं आंसू… राजकारणाची सर्कस केली; सदाभाऊ खोत यांचा ठाकरे यांच्यावर थेट हल्ला?
20 जून हा शिंदे यांच्या बंडखोरीचा दिवस गद्दार दिवस आणि खोके दिन म्हणत राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावरून रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
बुलढाणा : 19 जूनला राज्यात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यांनी वर्धापन दिन कसला साजरा करता? गद्दारांनो गद्दार दिन साजरा करा असं म्हटलं होतं. तर 20 जून हा शिंदे यांच्या बंडखोरीचा दिवस गद्दार दिवस आणि खोके दिन म्हणत राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावरून रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
त्यांनी ठाकरेंनी जे पेरले तेच उगवलं. तर कोण कोणाचा गद्दार दिवस साजरं करतो, हेच राजकारणातील विचारांची दिवाळखोरी असल्याचं म्हटलं आहे. तर ठाकरे यांनी भाजप सोबत निवडणूक लढविली, अन् युती केली राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत. त्यामुळे ठाकरे यांनी लग्न ठरलं एकाबरोबर, हळद लावली एकबरोबर अन् अक्षदा एका बरोबर असं केलं. त्यामुळं नेमके गद्दार कुणी कुणाला म्हणायचे असा सवाल खोत यांनी केला आहे. तर ठाकरे यांची गट ही सौ चुहे खाके बिल्ली चली हज को अशी झाली आहे. त्यांनीच आधी महागद्दारी केली. त्यामुळे महागद्दारांनी दुसऱ्याला गद्दार म्हणू नये. तर सध्याच्या घडीला ठाकरे गट काय आणि शिंदे गट काय सगळेच एकाच माळेतील मनी असल्याचा घणाघात त्यांनी केला.