Sadabhau Khot : सदाभाऊ खोत विधानपरिषदेचा अर्ज मागे घेणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती
विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळतेय. उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तर सदाभाऊ आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) विधानपरिषदेचा अर्ज मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे पाच अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचं (BJP) संख्याबळ पाहता पाच उमेदवार निवडून आणतानाच त्यांना कसरत करावी लागेल. यातच जर सदाभाऊंना अपक्ष उमेदवारी देऊन त्यांना भाजपने पाठिंबा दिला मोठं अडचणीचं ठरेल. त्यामुळे रिस्क न घेण्याच्या उद्देशाने सदाभाऊ आपला अर्ज मागे घेण्याची शक्यताय. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळतेय. उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तर सदाभाऊ आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळतेय. आज विधानपरिषदेच्या 6 व्या जागेसंदर्भात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आज घेणार निर्णय आहेत. जर पक्षाकडून उमेदवारी कायम ठेवली तर अपक्ष म्हणून सदाभाऊ माघार घेणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज निर्णय होणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिली आहे.