Special Report | सदाभाऊ खोत यांच्या सैतान टीकेवर रोहित पवार यांचा पलटवार; म्हणाले, ‘मर्यादेत राहा’
यादरम्यान रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांनी पवारांना 'सैतान' म्हणून संबोधले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यावरून अजित पवार गटातील सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रवादीमध्ये झालेल्या पडझडीनंतर बाहेर पडले आहेत. ते राज्याच्या दौऱ्यावर असून पक्षबांधणीसाठी निर्धाराने ते मैदानात उतरले आहेत. यादरम्यान रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांनी पवारांना ‘सैतान’ म्हणून संबोधले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यावरून अजित पवार गटातील सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला. यानंतर आमदार रोहित पवार यांनीही थेट सदाभाऊ खोत यांची लायकी काढत त्यांना थेट सल्लाच दिला. रोहित पवार यांनी खोत यांना, मला सांगायचंय की, मर्यादेत राहा. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्हीही आमच्या पद्धतीने दाखवू. बातमी करण्यासाठी तुम्ही तुमची लायकी सोडत असाल तर आम्ही काय इथं शांत बसणार आहोत का?, असा सवाल करत मर्यादेत राहा असा इशारा दिला आहे.