कराडमधील युवक ठरला Dream 11 चा विजेता, कोण आहे ‘तो’ पठ्ठ्या ज्यानं जिंकले 1 कोटी 20 लाख
VIDEO | कराडमधील युवकाने ड्रीम इलेव्हनमध्ये जिंकले 1 कोटी 20 लाख, बघा व्हिडीओ कसा व्यक्त केला आनंद
सातारा : कराडच्या युवकाने ड्रीम इलेव्हन मध्ये तब्बल 1 कोटी 20 लाख रूपये जिंकले. ड्रीम इलेव्हनमुळे कराड तालुक्यातील काले टेक येथील सागर यादव या तरुणाचे नशीब उजळले असून या क्रिकेटप्रेमी युवकाला तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे. सागर गणपतराव यादव असे या पठठ्याचे नाव असून कराड तालुक्यातील काले टेक गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील तरुण.. लहानपणापासून क्रिकेटचे वेड.. महेंद्रसिंग धोनीचा फॅन .. गेल्या काही वर्षांपासून ड्रीम इलेव्हन गेम खेळत होता. आय पी एलमधील खेळाडूचा अभ्यास करत तो ड्रीम इलेव्हनवर टीम करत होता. खूप वेळा प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. मात्र चिकाटी सोडली नाही. अखेर सागरला यश मिळाले आणि त्याने निवडलेल्या टीम ला रँकिंग मिळाले आणि तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे बक्षीस लागले. या रकमेतील टी डी एस वजा करून 84 लाख रुपये त्याच्या खात्यावर जमाही झाले. सागरला मिळालेल्या या यशामुळे काले टेक गावात जल्लोष करण्यात आला. योग्य अभ्यास करून खेळल्यामुळेच यश मिळाल्याचे सागर याने सांगितले.