सहस्त्रकुंड धबधब्याचा रौद्र अवतार, धबधब्याचं आक्राळ विक्राळ रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
याचदरम्यान दरम्यान पुराच्या स्थितीत धबधब्याकडे जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र धबधब्याचे रूप पाहण्याचा मोह आवरत नसल्याने अनेक पर्यटक येथे येत आहेत.
नांदेड, 22 जुलै 2023 : जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने सहस्रकुंड धबधब्याचा प्रवाह वाढल्याचे पहायला मिळत आहे. तर मुसळधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. तर जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. ज्यामुळे इस्लापुर जवळ असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याने अक्राळविक्राळ रुप धारण केलय. धबधब्याचे असे दुर्मिळ दृश्य पहायला मिळत असून धबधब्याचं हे रौद्र रूप पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. याचदरम्यान दरम्यान पुराच्या स्थितीत धबधब्याकडे जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र धबधब्याचे रूप पाहण्याचा मोह आवरत नसल्याने अनेक पर्यटक येथे येत आहेत. तर नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे.
Published on: Jul 22, 2023 02:23 PM
Latest Videos