साईबाबाच्या तख्तीसमोर ढोंगी झुकले; बागेश्वर धाम बाबांच्या विरोधात ठाकरे गटाची बॅनरबाजी

साईबाबाच्या तख्तीसमोर ढोंगी झुकले; बागेश्वर धाम बाबांच्या विरोधात ठाकरे गटाची बॅनरबाजी

| Updated on: Apr 07, 2023 | 11:52 AM

साईबाबांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे राहुल कनाल यांनी बागेश्वर धाम बाबांच्या विरोधात मुंबई पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर यासंदर्भात बागेश्वर धाम बाबांनी माफी मागितली

मुंबई : साईबाबांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कुमार शास्त्री यांनी माफी मागितली आहे. जबलपूरमध्ये कथा सांगताना त्यांनी साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान केले होते, त्यानंतर संपूर्ण भारतात त्यांचा विरोध झाला होता. महाराष्ट्रात लोक रस्त्यावर उतरले होते. तर याप्रकरणी ठाकरे गटाचे राहुल कनाल यांनी बागेश्वर धाम बाबांच्या विरोधात मुंबई पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर यासंदर्भात बागेश्वर धाम बाबांनी माफी मागितली. याचा संदर्भ घेत राहुल कनाल यांनी पश्चिम उपनगरातील काही भागात बॅनरबाजी केली आहे. त्यावर साईबाबाच्या तख्तीसमोर समोर ढोंगी झुकले असं लिहिण्यात आलं आहे

Published on: Apr 07, 2023 11:52 AM