साई मंदिरात श्रद्धेची फुलं कचऱ्यात….
गेल्या काही दिवसांपासून फुले विक्रेत, ओवणी करणाऱ्या महिला आणि प्रसाद विक्री करणारे जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे साई मंदिर प्रशासन आणि व्यावसायिकांमधील वाद टोकला पोहचला आहे.
शिर्डीतील साईमंदिरातील हार, फुले आणि प्रसादाबाबतेच आंदोलन आता पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. राज्यातून आणि देशातून शिर्डीतील साई मंदिराला साईभक्त भेटत देत असतात. त्यावेळी साईभक्तांकडून श्रद्धेने फुले, हार आणि प्रसाद दान केला जातो मात्र या श्रद्धेला आता कचऱ्याची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे वाद आता प्रचंड विकोपाला गेला आहे. दान करण्यात आलेली फुले आणि हार या दोन्हीही गोष्टींना साई मंदिर प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून फुले विक्रेत, ओवणी करणाऱ्या महिला आणि प्रसाद विक्री करणारे जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे साई मंदिर प्रशासन आणि व्यावसायिकांमधील वाद टोकला पोहचला आहे.
Latest Videos