साई रिसॉर्ट प्रकरण : ईडीची कारवाई आणखी एकाला अटक
सदानंद कदमांच्या चौकशीनंतर आता ईडीने पुढचे पाऊल टाकत आणखी एकला अटक केल्याचे समोर येत आहे
मुंबई : मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आणि रामदास कदम यांचे धाकटे बंधू उद्योजक सदानंद कदम यांच्यावर कारवाई केली. कदम यांना ईडीने ताब्यात घेत चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना यांना अटक करण्यात होती. कदमांच्या चौकशीनंतर आता ईडीने पुढचे पाऊल टाकत आणखी एकला अटक केल्याचे समोर येत आहे. मात्र अटक केलेली व्यक्ती कोण हे काही समजलेलं नाही. याप्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांनी वारंवार अनिल परब यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले. सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर ईडी कडून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आल्याने सध्या चर्चांना उत आला आहे.
Published on: Mar 14, 2023 10:57 AM
Latest Videos