Kolhapur | मविआ सरकारकडून शेतकऱ्यांना केलेल्या घोषणांची पूर्तता नाही, समरजितसिंह घाटगे यांचा आरोप

| Updated on: Jun 28, 2021 | 8:03 PM

शेतकऱ्यांचे अनुदान आणि वीजबिल माफीसाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांची विज बिलं सरकार कसं भरतं, त्यांना गाड्या घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज कशी देतात असा सवाल देखील घाडगे यांनी उपस्थित केलाय. (Samarjit Singh Ghatge alligation on mahavikas aghadi regarding farmers)

कोल्हापूर : सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफी अनुदान आणि वीजबिल माफीची घोषणा करून दीड वर्ष होत आला तरी त्याची पूर्तता महाविकास आघाडी सरकारने केलेली नाही. या अधिवेशनात याबाबत निर्णय घ्या अन्यथा लोकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. लोक तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाहीत असा इशारा शाहू जनक घराण्याचे वंशज आणि भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी दिलाय. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. शेतकऱ्यांचे अनुदान आणि वीजबिल माफीसाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांची विज बिलं सरकार कसं भरतं, त्यांना गाड्या घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज कशी देतात असा सवाल देखील घाडगे यांनी उपस्थित केलाय.