Sambhaji Bhide : भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?
Sangli Stray Dog News : संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे. त्यानंतर त्यांना 2 इंजेक्शन देण्यात आलेले आहेत.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे. सोमवारी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री साधारण 11 वाजता ते घराबाहेर पडले. त्यावेळी माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. यानंतर संभाजी भिडे यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी भिडे गुरुजी यांना 2 इंजेक्शन दिलेले आहेत. आणखी 4 इंजेक्शन त्यांना देण्यात येणार आहेत. सध्या मात्र त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले

गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार

सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
