Nitesh Rane: औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही हे संभाजी छत्रपती यांनी ठरवावं- नितेश राणे
संभाजी महाराजांना ज्यांनी तडफडून मारलं त्यांची कबर महाराष्ट्रात कशाला हवी? पुरातन खातं विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीला प्रतिसाद देत नाही. परंतु औरंगजेबाची कबर काही घडू नये म्हणून पाच दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवतात. कशी माणसे या खात्यात आहे बघा, असा संताप नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
कुडाळ – राज्य सरकारने (maha vikas aghadi) पाच दिवसांसाठी औरंगजेबाच्या कबरीवर येण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही या कबरीवरून सवाल केला आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांना आपण दोन पायावर जाऊ देतो हीच आपली शोकांतिका आहे. संभाजी महाराजांना ज्यांनी तडफडून मारलं त्यांची कबर महाराष्ट्रात (Maharashtra) कशाला हवी? पुरातन खातं विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीला प्रतिसाद देत नाही. परंतु औरंगजेबाची कबर काही घडू नये म्हणून पाच दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवतात. कशी माणसे या खात्यात आहे बघा, असा संताप नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हा सवाल केला. तसेच कबरीवर पर्यटकांना येण्यास मज्जाव करण्याऐवजी कबर ठेवताच कशाला? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही हे संभाजी छत्रपती यांनी ठरवावं, असा खोचक सवालही त्यांनी केला.