विधिमंडळात जाऊन कशाला बसता? आता खरं हेलीकॉप्टरने फिरणं गरजेचं; संभाजीराजे यांची कुणाकडे मागणी

विधिमंडळात जाऊन कशाला बसता? आता खरं हेलीकॉप्टरने फिरणं गरजेचं; संभाजीराजे यांची कुणाकडे मागणी

| Updated on: Mar 22, 2023 | 1:55 PM

Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांचं नुकसान यावर बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे. संभाजीराजे नेमकं काय म्हणालेत? पाहा...

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांचं नुकसान यावर बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. ज्या पद्धतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी फिरायला पाहिजे होतं तसं ते फिरले नाहीत. कशाला विधिमंडळात जाऊन बसता? आता खरं हेलीकॉप्टरने फिरणं गरजेचं आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने सरकारला विनंती करतो की, अडचणीत असलेल्या बळीराजाला मदत करायला पाहिजे. बळीराजा जगला तर आपण जगू शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येतो. सरकारने एकदाच लॉंग टर्म नियोजन करायला पाहिजे. मागणी झाली की मदत होऊ नये, लॉंग टर्म मदत करणं गरजेचं आहे, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.

Published on: Mar 22, 2023 01:52 PM