बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर छत्रपती संभाजी राजे आक्रमक; सरकराला ही सुनावलं
महात्मा गांधींच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या पायऱ्यांपासून रस्त्यावर यावरून आंदोलने केली जात आहेत. तर याचमुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रायगड, 3 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या पायऱ्यांपासून रस्त्यावर यावरून आंदोलने केली जात आहेत. तर याचमुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र अजुनही संभाजी भिडे यांच्यावर कारवाई झालेली नाही. यादरम्यान स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे हे देखील आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून बोलताना, भिडे हे महापुरुषांचा अपमान करत सुटले आहेत. सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही? कारवाई करण्याऐवजी ते आपल्या पक्षाने नाहीत असा खुलासा का करत बसलेत? भिडे हे काणासाठी काम करतात? त्यांचा संबंध कोणाशी आहे हे आम्हाला माहीत नाही काय? असे खेड बोल सुनावत सरकारने भिडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी राजे यांनी केली आहे.