Video : संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

Video : संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

| Updated on: May 19, 2022 | 6:00 PM

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याची घोषणा केलीय. त्या पार्श्वभूमीवर ते सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांची […]

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याची घोषणा केलीय. त्या पार्श्वभूमीवर ते सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत आहेत. मात्र, शिवसेनेनं राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

Published on: May 19, 2022 06:00 PM