चंद्रकांत खैरे यांना किंमत देत नाही; सत्तेतील मंत्र्यांचा खैरेंवर निशाना
महाविकास आघाडीची 2 एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये सभा आहे, ही सभा होऊ नये म्हणून भाजपनं हा कट रचला असंही खैरे म्हणाले
ठाणे : छ. संभाजीनगरमधील राडा हा पूर्वनियोजित कट होता यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. तर दंगे घडवणाऱ्यांना शिंदे-फडणवीस आणि जलील यांनी छुपी मदत केली असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तसेच महाविकास आघाडीची 2 एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये सभा आहे, ही सभा होऊ नये म्हणून भाजपनं हा कट रचला असंही खैरे म्हणाले. यावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चंद्रकांत खैरे यांना मी किंमत देत नाही. रामनवमी व रमजान ही सुरू आहे अशावेळी सर्व सामाजिक लोक एकत्र राहिले पाहिजेत असा प्रयत्न गरजेच आहे. तर सरकार ही प्रामाणिकपणे हे काम करत आहे. पण एखादा माणूस पेटवा पेटवीचं राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. राज्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे थांबवलं पाहिजे असेही ते म्हणाले.
Published on: Mar 31, 2023 10:45 AM
Latest Videos