चंद्रशेखर बावनकुळे झोपेत आहेत, त्यांना देश कळत नाही, संजय राऊत यांचा पलटवार

“चंद्रशेखर बावनकुळे झोपेत आहेत, त्यांना देश कळत नाही”, संजय राऊत यांचा पलटवार

| Updated on: Jun 26, 2023 | 9:57 AM

काही दिवसांपूर्वी पाटणामध्ये झालेल्या बैठकीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. "2019 ला 17 विरोदी पक्ष एकत्र येऊनही मोदींचा विजय झाला. कितीही विरधक एकत्र आले तरी 140 कोटी भारतीय जनता मोदींनाच मत देणार," असं बावनकुळे म्हणाले. यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सातारा : काही दिवसांपूर्वी पाटणामध्ये झालेल्या बैठकीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “2019 ला 17 विरोदी पक्ष एकत्र येऊनही मोदींचा विजय झाला. कितीही विरधक एकत्र आले तरी 140 कोटी भारतीय जनता मोदींनाच मत देणार,” असं बावनकुळे म्हणाले. यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “चंद्रशेखर बावनकुळे हे झोपेत आहेत. त्यांनी नीट डोळे उघडलेले नाही. अशा माणसाकडून काय अपेक्षा ठेवणार, बावनकुळेंना विधानसभेचे तिकीट नाकारलं होतं, 2019 ची परिस्थिती वेगळी होती आताची वेगळी आहे, 2024 मध्ये आम्ही एकास एक किमान 450 उमेदवार देणार.”

Published on: Jun 26, 2023 09:57 AM