नागपुरात अवैध रेती उत्खनन जोमात, महसूल विभाग कोमात; रेतीडेपोच्या नावाखाली अवैध रेती उत्खनन
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे. मात्र गृहमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन हे जोमात सुरू असल्याचेच दिसत आहे. येथील मौदा तालुक्यात नियम धाब्यावर बसवत रेतीचं उत्खनन करण्यात येत आहे.
नागपूर : वाळूचे उत्खनन सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या कालावधीतच करता येईल. नदीपात्रात जास्तीस्त जास्त 3 मीटर इतक्या खोलीपर्यंत निविदाधारक किंवा ठेकेदारास वाळूचे उत्खनन करता येईल. रेल्वे किंवा रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूनं 600 मीटर अंतराच्या आत वाळूचे उत्खनन करता येणार नाही असे नव्या वाळू धोरणातील नियम आहेत. त्याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे. मात्र गृहमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन हे जोमात सुरू असल्याचेच दिसत आहे. येथील मौदा तालुक्यात नियम धाब्यावर बसवत रेतीचं उत्खनन करण्यात येत आहे. ते ही थेट नदीपात्रात पोखलॅंड लावून अवैध रेती उपसा केली जात आहे. रेतीडेपोच्या नावाखाली थेट नदीतून अवैध रेती उत्खनन केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी प्रशासनावर आरोप करताना यावर स्थानिक महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं आहे.