झुके गा नई साला!, पुष्पा गँगला पोलिसांनी बेड्या ठोकल्या; महाराष्ट्रातच झाली सगळ्यात मोठी कारवाई
झुके गा नई साला! यानंतरच राज्याच्या अनेक ठिकाणी पुष्पा गँग उदयास आल्या होत्या. त्यांच्याकडून चंदनाची तस्करी होत होती. याचा पर्दाफार्श पोलिसांनी केला होता. ज्यात सांगली, बीड, नगर, पुणे अशा टिकाणी कारवाया करण्यात आल्या होत्या. तर अनेकांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं होतं
परभणी : गेल्या वर्षात आलेला ‘पुष्पा’ चित्रपट आठवतोय का? त्यातला एक डॉयलॉग चंगलाच प्रसिद्ध झाला होता. झुके गा नई साला! यानंतरच राज्याच्या अनेक ठिकाणी पुष्पा गँग उदयास आल्या होत्या. त्यांच्याकडून चंदनाची तस्करी होत होती. याचा पर्दाफार्श पोलिसांनी केला होता. ज्यात सांगली, बीड, नगर, पुणे अशा टिकाणी कारवाया करण्यात आल्या होत्या. तर अनेकांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा या पुष्पा गँगचं नाव ऐकण्यात आलं आहे. मात्र यावेळी वनविभाग आणि पोलिसांनी एकत्र येत कारवाई केल्याने तब्बल 10 जनांना एटक करण्यात आली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील अंबेगाव व सोनुळा शिवारात ही गँग चंदनाची तस्करी करत होती. शेतमालकासह 10 आरोपींना वन विभाग व मानवत पोलिसांच्या अटक केलीय. अवैधरीत्या तस्करी केलेले चंदन, गुन्हे कामात वापरलेले वाहन, 7 मोटारसायकली व चंदन तोडण्याकरीता वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.