“ठाकरे गटाने समोर आरसा ठेवून मोर्चा काढावा”, मनसेच्या ‘या’ नेत्याने केली टीका
काही ना काही कारणांमुळे मुंबई महापालिका निवडणूक लांबत चालली आहे. महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट होत आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला ठाकरे गटाकडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, असा एल्गार ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई : काही ना काही कारणांमुळे मुंबई महापालिका निवडणूक लांबत चालली आहे. महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट होत आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला ठाकरे गटाकडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, असा एल्गार ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांनी केला आहे. माजी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “समोर आरसा ठेवायचा आणि शिवसेनेने मोर्चा काढायचा. 25 वर्ष सत्तेत असताना त्यांनी मुंबईकरांची वाट लावली आणि आज मोर्चे काढत आहेत.”
Published on: Jun 22, 2023 11:17 AM
Latest Videos