“राजसाहेब, आपणही दसरा मेळावा घेऊ, बाळासाहेबांचा विचारांचा घेऊन पुढे जाऊ”
"राजसाहेब, आपणही दसरा मेळावा घेऊ, बाळासाहेबांचा विचारांचा घेऊन पुढे जाऊ",असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. दसरा दिवशी राज ठाकरेंनी तमाम हिंदू जनतेला मार्गदर्शन करावे अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे , असंही संदीप देशपांडे म्हणालेत. तर दुसरीकडे काहीही झालं तरी शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असं शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कमध्ये नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Published on: Aug 30, 2022 09:49 AM
Latest Videos