Special Report | Sandeep Deshpande गाडीतून निघाले आणि महिला पोलीस पडल्या
या दोघांवरही कलम 353 हे कलम लावण्यात आले असून त्यामध्ये सरकारी कामात अडथळे आणत प्राण घातक हल्ला करणे, कलम 279 निष्काळजीपणाने गाडी चालवणे, कलम 336 दुसऱ्या व्यक्तीस दुखापत होईल असे कृत्यं करणे याप्रकारचे कलम त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.
राज ठाकरेंच्या निवासस्थानासमोर मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेत होते. यावेळी दोघांनीही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. या दोघांचाही शोध पोलीस घेत असून ते अजूनही नॉटरिचेबल दिसत आहेत. राज ठाकरेंच्या घरासमोर ही धरपकड होत असताना संदीप देशपांडेंना पकडण्यासाठी पोलिसांचे पथकातून पुढे आलेल्या महिला पोलीसाला धक्का लागला आणि त्या खाली पडल्या. यामध्ये त्या जखमीही झाल्या आहेत. त्यानंतर आजूबाजूच्या पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांची विचारपूस केली.
या प्रकरणी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांच्यावर विविध कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला गेला आहे. या दोघांवरही कलम 353 हे कलम लावण्यात आले असून त्यामध्ये सरकारी कामात अडथळे आणत प्राण घातक हल्ला करणे, कलम 279 निष्काळजीपणाने गाडी चालवणे, कलम 336 दुसऱ्या व्यक्तीस दुखापत होईल असे कृत्यं करणे याप्रकारचे कलम त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.