Special Report | झाडीवाले शहाजी बापूंनंतर मिरचीवाले भुमरे व्हायरल
त्या डायलॉग घेऊनच आता संदीपान भुमरे यांना फोन जाताहेत. त्यात कार्यकर्ते त्यांना विचारतात की, मिरचीवाली पोस्ट कशी सोडू, तुम्ही पाठवता असंही त्यांना विचारलं जातं आहे. त्यामुळे त्यांच्या या कॉलने आता धूमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे.
शिवसेनेतून बंडखोरी करून मुंबई-सुरत-गुवाहाटीला गेलेल्या शहाजी बापू पाटील यांचा रिकॉर्डींग कॉल व्हायरल झाला आणि सगळ्या सोशल मीडियावर शहाजी पाटील यांच्या डायलॉगने धुमाकूळ घातला. काय डोंगेर, काय हाटील या डायलॉगनंतर आता मिरचीवाला डायलॉगची भर घातली आहे. औरंगाबादमधील पैठणचे आमदार असणारे संदीपान भुमरे यांना त्यांच्या कार्यकर्त्याचा फोन आला. त्यानी अभिनंदन केल्यानंतर संदीपान भुमरे त्याला फेसबूक पोस्ट व्हायरल करायला सांगतात. त्यामध्ये ते म्हणतात मिरची लागेल अशी सोड. त्या डायलॉग घेऊनच आता संदीपान भुमरे यांना फोन जाताहेत. त्यात कार्यकर्ते त्यांना विचारतात की, मिरचीवाली पोस्ट कशी सोडू, तुम्ही पाठवता असंही त्यांना विचारलं जातं आहे. त्यामुळे त्यांच्या या कॉलने आता धूमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे.
Latest Videos