“…तर चंद्रकांत खैरे यांना 500 एकर देणार”, संदीपान भुमरे यांचं चॅलेंज
ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला. "संदीपान भुमरे यांची टक्केवारीची प्रकरणं 8 जुलैला बाहेर काढणार", असं चंद्रकांत खैरे म्हणाले. यावर संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद : ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला. “संदीपान भुमरे यांच्या वडिलांची 4 एकर जमीन होती, आता भुमरे यांच्याकडे 700 एकर जमीन कुठून आली, 10 वाईन शॉप लायसन्स, पेट्रोल पंप, हॉटेल हे सगळं कुठून आलं? भागवत कराड, संदीपान भुमरे यांच्या सगळ्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, मी वेळेवर याबाबत बाहेर काढणार आहे. त्यांची टक्केवारीची प्रकरणं 8 जुलैला बाहेर काढणार”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. यावर संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझे सातबरे बघा माझ्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, मी काही दुरड्या विकून राजकारण केलं नाही, खैरेच संतुलन बिघडलेलं आहे. खैरे यांना मीच धडा शिकवणार आहे.माझी जर 700 एकर जमीन असेल तर चंद्रकांत खैरे यांना 500 एकर जमीन देणार. त्यातली फक्त 200 एकर मला ठेवेन”, असं संदीपान भुमरे म्हणाले.