“डोक्यात गोळी घालायचं शिंदे बोललेच नव्हते,” शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानेच दीपक केसरकर यांचा दावा खोडला
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या दिवशीच दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड यशस्वी झाला नसता तर डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूर : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या दिवशीच दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड यशस्वी झाला नसता तर डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर एकच खळबळ उडाली. या विधानावर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दीपक केसरकर यांनी आपलं वैयक्तिक मत माडलं आहे. मी स्वत: पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो. शिंदे साहेब हे हलक्या मनाचे नाहीत. ते रडणारे नाही लढणारे आहेत. त्यामुळे गोळी मारून घेण्याची भाषा शिंदे यांनी केली नाही. आम्ही सर्व एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत,” अशी स्पष्टोक्ती मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.