लोकसभा निवडणुकीत युतीची साथ की महाविकास आघाडीच्या हातात हात? स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय?
Sangali Raju Shetti on Loksabha Election 2024 : राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना सोबत न घेण्याचेही संकेत दिले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलंय. पाहा...
सांगली : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. अशात सर्वच पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी याविषयी माहिती दिली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले, बुलढाणासह 6 लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. लवकरच उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे कृषीमंत्री असंवेदनशील मंत्री आहेत, असंही ते म्हणालेत.
Published on: Mar 22, 2023 04:11 PM
Latest Videos