सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम, शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार
सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह त्यांच्या सोबत 48 हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वचे राजीनामे दिले आहे.
सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह त्यांच्या सोबत 48 हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वचे राजीनामे दिले आहे. त्यामुळे शिवाजीराव नाईक आपल्या सर्व कार्यकर्त्या समवेत शनिवारी 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा येथे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार आहेत. यशवंत ग्लुकोज कारख्ण्याच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्षांनी हेतू पुरस्पर डावललं
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सोबत शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष सुखदेव पाटील, ओ.बी.सी.सेलचे सांगली जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद गुरव,शिराळा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सागर नाईक, सांगली जिल्हा युवा मोर्चा उपाअध्यक्ष पांडुरंग गायकवाड, वाळवा पश्चिम मंडल अध्यक्ष सी.एच. पाटील यांच्यासह 14 सेल व 13 आघाड्याच्या सर्व पदाधिकारी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये 334 बूथ केंद्र,84 शक्ती बूथ केंद्राच्या सर्व पदाधिकारी व शिराळा तालुक्यातील 27 सरपंच 219 ग्रामपंचायत सदस्य व वाळवा तालुक्यातील 17 सरपंच व 137 ग्रामपंचायत सदस्य यांनी ही पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत.भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना हेतू पुरस्कर डावलण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोप नाईक यांनी केला आहे.