नदीत सोडलेल्या मळीमिश्रीत पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात? कुठं घडला धक्कादायक प्रकार?
VIDEO | कृष्णा सहकारी कारखान्याचं मळीमिश्रीत पाणी नदीत, सांगलीच्या नदीत सोडलेल्या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात?
सांगली, ५ ऑगस्ट २०२३ | सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी पात्रात कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी पुन्हा नाल्यातून बिनधास्तपणे सोडले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वाळवा तालुक्यातील कोळे गावाजवळ हा प्रकार समोर आला असून कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. रेठरे बुद्रुक. या कारखान्यातून हे मळीयुक्त सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेती ही धोक्यात आली आहे अनेक वेळा लाखो माशाचा मृत्यूही झाला आहे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कारवाई करणार का असा प्रश्न ग्रामस्थ विचारात आहेत.
कृष्णा नदीत नदी काठच्या कारखान्यातून सातत्याने मळीमिश्रीत सांडपाणी सोडले जात असल्याचा आणि यातून नदीचे प्रदूषण आणि मासे मरण्याच्या घटना सातत्याने घडलेल्या आहेत. असे असताना देखील आजही अनेक कारखानामधील मळीमिश्रीत सांडपाणी कृष्णा नदीत सरार्सपणे सोडले जात असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. वाळवा तालुक्यातील कोळे गावच्या हद्दीत अनेक नाल्यातून कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे समोर येत आहे.यामुळे कोळे गावाला मळी मिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा तर होत आहे शिवाय या सांडपाणीमुळे इथल्या पिकांवर देखील परिणाम होत आहे.