विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी वाद सुरुच आहेत. यावर आता कॉंग्रेस विदर्भात सांगली पॅटर्न राबविण्याच्या विचारात असल्याचे म्हटले आहे.यावर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
| Updated on: Oct 19, 2024 | 5:21 PM

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणूका होणार आहेत. परंतू अद्याप ही महाविकास आघाडी किंवा महायुती या दोघांची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. अनेक इच्छुकांची संख्या आणि घटक पक्षांना सांभाळून घेताना प्रत्येक पक्षाला स्वत:च्या कार्यकर्त्यांना आवरावे लागत आहे. तसेच पक्षाची वाढ देखील करायची आहे. या द्विधा मनस्थितीत प्रत्येक पक्ष आहे. कॉंग्रेसला लोकसभेला महाविकास आघाडीत विदर्भाने मोठा हात दिला आहे. विदर्भ खरे तर कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हटला जात होता. परंतू साल 2014 पासून हा भाजपाच्या ताब्यात गेला होता. आता तो पुन्हा कॉंग्रेसकडे येतो आहे. सांगलीत कॉंग्रेसचा बेस असताना ही जागा महाविकास आघाडीत शिवसेनेकडे गेल्याने येथे कॉंग्रेसचे बंडखोर विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले आणि शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांचा मोठा पराभव झाला.या निवडणूकीत कॉंग्रेसची मते चंद्राहार यांना पडली नाहीत त्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये धुसफूस असताना आता पुन्हा विधानसभेत विदर्भात जागा न दिल्यास कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबवू शकते असे म्हटले जात आहे. याबाबत कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना विचारले असता असे काही नाही. आमच्या चर्चा सुरु असून चर्चेने सर्व प्रश्न सुटतील असे म्हटले आहे.

 

Follow us
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?.
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.