Ramdas Athavale VIDEO | कशासाठी काढताय तुम्ही भोंगे, काय करताय अशी सोंगे.. सांगलीत रामदास आठवलेंनी दोन्ही ठाकरेंचे कान टोचले!
एका बाजूला काँग्रेस दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आहे. मी मुख्यमंत्री यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण काही जमत नाही. पण ठीक आहे. तुम्ही त्या ठिकाणी सुखनी नांदा पण होऊ देऊ नका वांदा, असा सल्ला रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
सांगलीः कशासाठी काढताय तुम्ही भोंगे.. का करताय तुम्ही अशी सोंगे? अशा आशयाची शेरेबाजीकरून आरपीआय (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) सांगलीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोंग्यांविरोधातील आंदोलनावर टीका केली. एक दोन वेळी त्यांचा अजान असो आणि आपण समजून घेत नाहीत. आपले गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांना ते विरोध करत नाहीत, मग आपण अशी दादागिरी करणं योग्य नाही, असं रामदास आठवलेंनी म्हटलं. सांगली येथे आरपीआयच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. शीर्ष कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या रामदास आठवले यांनी विविध विषयांवर चारोळ्या करून उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन केलं तसंच कवितांच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या राजकारणावर टीकाही केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही यावेळी त्यांना कान टोचले.
Published on: May 06, 2022 04:32 PM
Latest Videos