‘तेव्हा आदित्य ठाकरे यांची नैतिकता कुठे गेली होती?’, गायकवाड यांचा खोचक सवाल
बुलढाणा : संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या गप्पा करू नयेत. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्ही नाही का गद्दारी केली मतदारांशी? तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली? सत्तेच्या लालसेपायी तुम्हीच लाचार झाले. काँग्रेस,राष्ट्रवादी तुमचे काय हाल करेल तुम्हीच पाहा’, असं म्हणत संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार […]
बुलढाणा : संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या गप्पा करू नयेत. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्ही नाही का गद्दारी केली मतदारांशी? तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली? सत्तेच्या लालसेपायी तुम्हीच लाचार झाले. काँग्रेस,राष्ट्रवादी तुमचे काय हाल करेल तुम्हीच पाहा’, असं म्हणत संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. कर्नाटकातील निकालावरून आदित्य
ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला होता. महाराष्ट्रातली जनताही खोके सरकारला पळवून लावेल, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.
कर्नाटकातील निकालानंतर संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. ते म्हणाले की,’कर्नाटक विजयाचे श्रेय कुणी घेऊ नये.कर्नाटकातील जनतेच्या मानसिकतेमुळे काँग्रेसचा विजय झाला.प्रत्येक वेळी कर्नाटकची जनता विरोधी पक्षाला संधी देत असते.तसेच महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचच सरकार येईल, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकच्या निकालाशी उद्धव ठाकरे यांचा संबंध उरत नाही. त्यांनी निवडणुकीवर भाष्य करू नये. काँग्रेस स्वबळावर निवडणूक जिंकू शकते तर ते महाविकास आघाडीत राहणार की नाही, यातबाबत शंका आहे. काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे, बाकीचे कितीही बोलू दे त्याला काही अर्थ नाही.