लोकसभेच्या किती जागांवर भाजप लढणार? शिवसेनेचा आमदार स्पष्टचं बोलला…
भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यादी जाहीर केली आहे.यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बुलढाणा : भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यादी जाहीर केली आहे.यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकसभेच्या राज्यातील 48 जागा भाजप एकटा चिन्हावर लढणार नाही तर भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर लढणार”, असं संजय गायकवाड म्हणाले. संजय गायकवाड यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे, पण बाळासाहेब आमच्या विचारात, रक्तात आहे.होऊ शकतं एखाद्या वेळेस अशी गोष्ट घडू शकते. त्याचा बाऊ करायची गरज नाहीये. पण जो निर्णय जनतेने जाहीर केला की, असा मुख्यमंत्री होणे नाही. जर भाजप 135 ते 140 जागा घेईल आणि एकनाथ शिंदे 90 ते 95 जागेवर लढतील असं जर असेल तर आगामी दीड वर्षात आम्ही मोठी मुसंडी मारू”