एकनाथ शिंदे आंबेडकर यांचा सल्ला स्विकारणार? संजय गायकवाड म्हणतात, प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते…!
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर दिल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून सोबत लढू अस आवाहन केल. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनाही सोबत लढण्याची ऑफर दिली आहे.
बुलढाणा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर दिल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून सोबत लढू अस आवाहन केल. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनाही सोबत लढण्याची ऑफर दिली आहे. यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय, अशी चर्चा सुरू झाली.यावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधान केलं आहे. “ज्यावेळी सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईल, त्यावेळी सत्ता संपत असते. भाजपा सेना युती आहेच.पण प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत.त्यामुळे एकनाथ शिंदे, आंबेडकर यांचा सल्ला कसा स्वीकारतात हे तेच ठरवतील”.
Published on: May 26, 2023 08:16 AM
Latest Videos