भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांचा गेम केला, ठाकरे गटाच्या नेत्याचं टीकास्त्र

“भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांचा गेम केला”, ठाकरे गटाच्या नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Jul 03, 2023 | 9:51 AM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकामध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. या सर्व गोंधळावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

परभणी: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकामध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. या सर्व गोंधळावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कधी कधी असं वाटतं की, शिंदे साहेबांनी राष्ट्रवादीवर खापर फोडून बंड करून तिकडे गेले,पण मुख्यमंत्री व्हायलाच ते तिथे गेले. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान यांनी 70 हजार कोटीचा आरोप राष्ट्रवादी वर केला होता. आणि आज त्यांना सत्तेत घेतलं, ज्यांना नाव ठेवता आणि त्यांच्यासोबतच सत्तेत सहभागी होता. ग्रामपंचायतचे सदस्य लवकर फुटत नाहीत, तेवढ्या लवकर आमदार आणि मंत्री फुटतात म्हणजे काय समजावं. राजकारणाची उंची या सर्वांनी घालवली आहे. तुम्हाला लोकांनी समाजकारणासाठी निवडून दिले, आणि तुम्ही…”  संजय जाधव नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 03, 2023 09:51 AM