पुणे भाजपतील नेत्यांमध्ये नाराजी? बड्या नेत्याने खरी परिस्थिती सांगितली…
पुण्यात कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. पण पुण्यातील भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्यावर माजी खासदार, भाजपचे नेते संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
पुणे : पुण्यात कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. पण पुण्यातील भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्यावर माजी खासदार, भाजपचे नेते संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी नाराज नव्हतो. माझ्या वैयक्तिक कामामुळे मी बाहेर होतो. मी आजपासून प्रचारात सक्रिय होणार आहे. आमच्या पक्षात कुठलेही नाराजी नाट्य नाही. आम्ही आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून आणू. कालच्या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराला जिंकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं काकडे म्हणालेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत 40 ते 45 टक्केच मतदान होईल. आम्ही 25 ते 28 हजार मतांनी निवडून येऊ, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केलाय.
Latest Videos