“किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओवर मनीषा कायंदे, चित्रा वाघ, नीलम गोऱ्हे गप्प का?”, ठाकरे गटाचा सवाल
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे संजय पवार यांनी देखील किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
कोल्हापूर, 19 जुलै 2023 | भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. ठाकरे गटाने आक्रमक होत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली. मात्र कोल्हापुरात किरीट सोमय्या यांच्या विरोधातील आंदोलनाला कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली. “आंदोलन करायचं असेल तर एक दिवस आधी आम्हाला कळवा. पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्यास गुन्हे दाखल करणार, अशी सूचना कोल्हापूर पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिली आहे.” ही माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली. संजय पवार पुढे म्हणाले की, “ही दडपशाही आहे. किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता चित्रा वाघ , नीलमताई , कायंदे ताई काय करत आहेत? तुम्ही बोला ना.”
Published on: Jul 19, 2023 10:51 AM
Latest Videos