शिवसेनेची स्वच्छता होत आहे…
बंडखोरांमुळे शिवसेना पक्षावर वा उद्धव ठाकरेंवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अर्जुन खोतकर गेल्यामुळे पक्ष साफ झाला आहे अशी जोरदार टीकाही केली आहे.
राज्यात बंडखोरी नाट्य झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले आहे, तर अजूनही काही आमदार, नेते शिंदे गटाकडे जाणे चालूच आहे. शिवसेनेचे गटनेते अर्जुन खोतकरांना आज शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर कोल्हापुरातून तीव्र पडसाद उमटले. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुखांनी अर्जुन खोतकरांवर टीका करत अशा नेत्यांमुळे शिवसेनेची स्वच्छता होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्या प्रत्येक आमदार आणि खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना संजय पवार यांनी सांगितले की, आपल्यावरचे पाप झाकण्यासाठी बंडखोर आमदारांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. आणि गेल्या 56 वर्षात असे कितीतरी धक्के शिवसेनेने सहन केले आहेत त्यामुळे आता जे आमदार जाणार आहेत किंवा जात आहेत. त्या बंडखोरांमुळे शिवसेना पक्षावर वा उद्धव ठाकरेंवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अर्जुन खोतकर गेल्यामुळे पक्ष साफ झाला आहे अशी जोरदार टीकाही केली आहे.