संजय राठोडांना मोठा धक्का!, बंजारा समाजाचं मन वळवण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी
बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
वाशिम : बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सुनील महाराज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीवेळी ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती आहे. संजय राठोड यांच्या पाठिशी बंजारा समाज आहे. राठोड सध्या शिंदेगटात आहेत. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे.
Published on: Sep 29, 2022 10:56 AM
Latest Videos