Sanjay Raut: संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या प्रवक्तेपदासाठी नव्या नावांची चर्चा
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत हे मोहरा आहेत तर संजय राऊत हे सूत्रधार असल्याचे इडीने न्यायालयात सांगितले आहे. या घोटाळ्यात राऊतांना 1 कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या प्रवक्ते पदासाठी नव्या नावांची चर्चा सुरु आहे. यामध्ये खासदार अरविंद सावंत यांना मुंबईमध्ये तर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना दिल्लीसाठी नियुक्त करण्यात येऊ शकते. संजय राऊत यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील इडी कार्यालयात जाणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या वकिलासमोर इडी राऊत यांची चौकशी करणार आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत हे मोहरा आहेत तर संजय राऊत हे सूत्रधार असल्याचे इडीने न्यायालयात सांगितले आहे. या घोटाळ्यात राऊतांना 1 कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. संजय राऊत यांच्या अटकेवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोधकांचे मनोधैर्य तोडण्याचे काम मोदीसरकार करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.