“शिंदे-फडणवीस माफी मागा, अन्यथा…”, वारकऱ्यांवरील लाठीचार्जवरून संजय राऊत यांचा घणाघात
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करतो. महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी निर्माण झाली हे आम्ही काल पाहिले. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. प्रत्येक ठिकाणी भाजप आपली राजकीय मस्ती दाखवत असतो. भाजपने टोळी पाळल्या आहेत आणि ते तिकडे तणाव निर्माण करतात. बेदमपणे वारकऱ्यांना लाठिचार्ज होताना पाहिलं,ते कोणी नाकारु शकत नाही.जगात वारीचा सन्मान केला जातो. ही सत्तेची मस्ती आहे का? हिंदुधर्माभिमानी मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? हिंदु मोर्चा काढणारे कुठे आहेत? त्र्यंबकेश्वर मध्ये घुसलेलेच आळंदीमध्ये दिसले. शिंदे-फडणवीस यांनी वारकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा आषाढीच्या विठ्ठल पूजेला बसू नये”, असं संजय राऊत म्हणाले.