सोमय्यांचा 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा, लवकरच भ्रष्टाचार उघड करणार - संजय राऊत

सोमय्यांचा 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा, लवकरच भ्रष्टाचार उघड करणार – संजय राऊत

| Updated on: Apr 15, 2022 | 12:44 PM

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर घोटाळ्याचा आणखी एक आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे.

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर घोटाळ्याचा आणखी एक आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबाचा सहभाग आहे. युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून खोटी बिलं दाखवून सोमय्या यांनी हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मी लवकरच उघड करणार आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मी काय करणार हे कळेल. आज तुम्ही त्या आरोपीला प्रश्न विचारा. इलू इलू क्या है असं आपण म्हणतो ना, तसं टॉयलेट घोटाळा (toilet scam) काय आहे, असं त्या आरोपीला विचारा, असं राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. त्यामुळे त्याला किरीट सोमय्या काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Apr 15, 2022 12:44 PM