Sanjay Raut : मुलाखतीत लोकांच्या प्रश्नांना उत्तरं, वाईट वाटण्याचं कारण नाही, एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा टोला
शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या लोकांना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, असा टोलाही शिवसेना नेते संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला लगावलाय. यावेळी त्यांनी अर्जुन खोतकरांवरही भाष्य केलंय.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर आज भाष्य केलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर दिल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि उलथापालथ यावर त्यांनी भाष्य केल्याचंही राऊत म्हणालेत. शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या लोकांना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, असा टोलाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला लगावला आहे. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर (Udhhav Thackeray Interview) भाष्य केलंय. तर याचदरम्यान त्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनीया गांधी यांची ईडी चौकशी, शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांची आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या भेटीवरही भाष्य केलंय.