उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत मातोश्रीवर दाखल
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काबाबत, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 8 ऑगस्टला संख्याबळ दाखवले जाणारेय.
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut )उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मातोश्रीवर दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र घेतलं जातंय . नाशिक आणि मालेगावमधील(Nashik & malegav) नगरसेवकांकडूनही (corporater ) शपथपत्र घेतल जात आहे. शिवसैनिकांनी युद्धावर ठाकरे यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे व त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी शपथपत्र आणि सभासद नोंदणी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या सूचना जिल्हाप्रमुखाना देण्यात आल्या आहेत, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काबाबत, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 8 ऑगस्टला संख्याबळ दाखवले जाणारेय.
Published on: Jul 24, 2022 03:17 PM
Latest Videos