Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात अयोध्या दौरा, दौरा राजकीय नाही, संजय राऊतांची माहिती
मोठं वातावरण करायचं नाही. अयोध्या दौरा हा धार्मिक आहे. शक्तीप्रदर्शन करणार नाही, असं राऊतांनी म्हटलंय.
मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात अयोध्या (aayodhya)दौरा नेहमी चर्चेत असतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी केलेला विरोध आजही चर्चेत आहे. त्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात उठलेलं वादळ, त्यानंतर झालेल्या सभाही अवघ्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. यातच आता अयोध्येशी संबंधीत एक बातमी आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही नेते अयोध्येला जाणार आहे. यासंबंधीची माहिती खुद्द शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना दिली आहे. अयोध्या दौऱ्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, ’15 जून रोजी आम्ही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात अयोध्येला जाणार आहोत. महाराष्ट्रातून काही नेते जातील. मोठं वातावरण करायचं नाही. अयोध्या दौरा हा धार्मिक आहे. शक्तीप्रदर्शन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.