जनतेच्या दरबारात हीच शिवसेना उभी करून दाखवणार, संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया
जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन वाढवला. त्याचे महत्व या ४० बाजारबुणगे यांनी गमावला. स्वायत्त यंत्रणा यांना गुलाम करण्याचा हा प्रयत्न आहे.
मुंबई : आजचा निर्णय हा अपेक्षित होता. हा विजय खोक्याचा आहे. रामाचे धनुष्यबाण आज रावणाला मिळालेलं आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन वाढवला. त्याचे महत्व या ४० बाजारबुणगे यांनी गमावला. स्वायत्त यंत्रणा यांना गुलाम करण्याचा हा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाला आव्हान दिले जाईल. पैशांच्या जोरावर पक्ष आणि चिन्ह असे विकत घेऊ शकत असतील तर लोकशाहीवरील विश्वास पूर्ण उतरला आहे. महाराष्ट्रावर सूड घेण्याचा प्रयत्न आहे. माझा निवडणूक आयोगावर विश्वास नाही. जनता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय विकत घेऊ शकत नाही. पैशानी विकत घेऊन झालेला हा फैसला आहे. कोटी रुपये घेऊन हा निर्णय घेतला आहे. कोण ते शिंदे आणि कोण ते बाजार बुणगे ? पण, जनतेच्या दरबारात हीच शिवसेना उभी करून दाखवणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.