“सध्याचे मुख्यमंत्री घरी जाणार, अजित पवार यांची डील मुख्यमंत्रिपदासाठीच”, संजय राऊत यांचा दावा
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 30 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी देखील मंत्रपदाची शपथ घेतली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 30 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी देखील मंत्रपदाची शपथ घेतली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आज गुरुपौर्णिमा आहे, आमचे गुरू बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. काल गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी गुरूला दगा देण्यात आला आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत मुख्यमंत्रिपदासाठीच डील केली आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं जाणार आहे. सध्याचे मुख्यमंत्री आणि सोबतचे 16 आमदार घरी जाणार आहेत. ते 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. 10 ऑगस्टपर्यंत हा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी ही तयारी सुरू आहे.”
Published on: Jul 03, 2023 01:18 PM
Latest Videos