एकनाथ शिंदे यांचा खुळखुळा झालाय; मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले...

“एकनाथ शिंदे यांचा खुळखुळा झालाय”; मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले…

| Updated on: Jun 16, 2023 | 1:12 PM

शिंदे-फडणवीस दोघेही दिल्लीत आले मात्र अजून राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. शिवसेनेच्या 5 मंत्र्याची गच्छंती होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : शिंदे-फडणवीस दोघेही दिल्लीत आले मात्र अजून राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. शिवसेनेच्या 5 मंत्र्याची गच्छंती होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या सरकारमध्ये अजिबात काही अलबेल नाहीये. अलबेल असतं तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रोखला गेला नसता. एक वर्ष झालं तरी विस्तार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार केंद्राने रोखला आहे. हा विस्तार भाजपने रोखला आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातात काही नाही. शिंदे यांचा खुळखुळा झाला आहे. ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्या हातात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे अधिकार आहेत, ना राज्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार. त्यांना एकच आदेश आहे. भ्रष्ट मंत्र्यांना आधी बाहेर काढा आणि मग विस्तार करा”, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Jun 16, 2023 01:12 PM